महाराष्ट्र

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde

ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल इस्टेट आणि हाउसिंग फायनान्स एक्स्पोमध्ये ते बोलत होते.

“सरकारचा अजेंडा हा केवळ विकासाचा आहे. मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ठाण्यात 50 लाखांपासून 12 कोटींपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असून, या एक्स्पोमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “घर देणं हा आशीर्वाद आहे,” असे नमूद करत एसआरए आणि म्हाडा प्रकल्पांतील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच खरा समाधान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. Balasaheb Thackeray यांनी दाखवलेले 40 लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाणे-मुंबई परिसरात 337 किमीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, ठाणे-बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पंतप्रधान Narendra Modi यांच्या मार्गदर्शनाखाली पॉड टॅक्सी प्रकल्पही राबवण्यात येणार असून, तो नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

घोडबंदर रोडचा विस्तार, एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीएचे पूल यांसारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होणार आहे. गायमुख परिसरातून ‘नवीन ठाणे’ विकसित करण्याची योजना असून, शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्यावर सरकारचा भर असून, कांदळवन संरक्षणासाठी कायदा आणि ग्रीन टीडीआरसारखे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “झाडे लावा,” असे आवाहन करत विकासकांनी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटी सवलत, प्रीमियम कपात आणि हप्त्यांची सुविधा देण्यात आली. रिअल इस्टेट क्षेत्र हे कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तलावांचे पुनर्जीवन, सुशोभीकरण आणि शहरातील विविध विकासकामांमुळे ठाणे शहराचा कायापालट होत असल्याचे त्यांनी सांगितले. Narendra Modi यांच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

17 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

17 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago