महाराष्ट्र

पुतण्याच्या लग्नात डान्स करत असताना काही सेकंदात झाल होत्याच नव्हत…

पुणे: मागच्या काही दिवसांत थंडीत वाढ झाल्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोणाला वाहन चालवताना झटका येऊन धक्का बसत आहे तर कुणाला नाचताना हृदयविकाराचा झटका येत आहे.

दरम्यान वाराणसीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळले. वाराणसीच्या पिपलानी कटरा अवघडनाथ टाकिया येथील मनोज विश्वकर्मा (वय 40) हे पुतण्याच्या लग्नात आनंदाने नाचत होते. त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने ते जागीच कोसळले. लग्न सोहळ्यात अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या काही मिनीटात आनंदाच्या भरात नाचणाऱ्या सगळ्यांना दु:खद घटनेला सामोरे जावे लागले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

औघडनाथ टाकिया येथील रहिवासी मनोज विश्वकर्मा यांच्या कुटुंबात 25 नोव्हेंबरला लग्न होते. दुपारी मिरवणुकीसाठी कुटुंबात जय्यत तयारी सुरु होती. वरातीत नाचताना मनोज यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते नाचतानाच बेशुद्ध पडले. यावेळी आजुबाजुला असलेल्या लोकांना त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु त्यांना ह्रदयविकाराचा झटका मोठा आल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago