crime
शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे युवकांच्या झालेल्या वादातून अकरा जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करत घरातील साहित्य अस्ताव्यस्थ टाकून देत नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंटी जाधव व त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील तन्मय शेंडकर व बंटी जाधव याची गावात भांडणे झाली दरम्यान तन्मय हा शेजारी असलेल्या धनराज शेरावतसि घरी पळत जाऊन भांडणे झाल्याची सांगत मदत मागितली त्यामुळे धनराज शेरावत, अविनाश शेरावत राजपाल शेरावत यांनी भांडणे झालेल्या ठिकाणी जाऊन बंटी याला जाब विचारला त्यानंतर काही वेळातच बंटी जाधव व त्याचे 10 साथीदार हातात लाकडी काठ्या, लोखंडी गज घेऊन सुवर्णा शेरावत यांच्या घरी आले त्यांनी सणसवाडी येथे तुमच्या मुलांनी आमच्याशी भांडणे केली असे म्हणून घरात जाऊन सुवर्णा यांची सासू राखी शेरावत हिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन घरातील साहित्य फेऊन देत सर्व साहित्य अस्ताव्यस्थ केले.
दरम्यान अविनाश शेरावत याने पोलिसांना फोन केल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने सर्व युवक पळून गेले तर घडलेल्या प्रकाराबाबत सुवर्णा अविनाश शेरावत (वय २५) रा. सराटेवस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बंटी जाधव व त्याचे 10 साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…