तेव्हा यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल
मुंबई: वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबुरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे.
चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई करताना देखील बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण तेव्हा कुठल्या नेत्याने निषेध व्यक्त केला नाही. उलट या शाखेवर कारवाई करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव होता, अशीही माहिती आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आता वांद्रे येथील शाखेवर कारवाई करताना गळा काढणाऱ्या उबाठा पक्षातील नेत्यांनी चेंबूरच्या शाखेवर कारवाई करताना झालेल्या अवमानाची देखील दखल घ्यायला हवी होती, असे शेवाळे म्हणाले. याचवर्षी 18 एप्रिल रोजी चेंबूर येथील सिंधी वसाहतीतील शिवसेनेच्या 154 क्रमांकाच्या शाखेवर पालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…