महाराष्ट्र

कोण होणार पुण्याचा महापौर! महापौरपदासाठी या नावांची जोरदार चर्चा

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत तब्बल १११ जागांवर आघाडी घेतली असून शहरातील राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम निकाल हाती आल्यानंतर आकड्यांमध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता असली, तरीही भाजपचा विजय स्पष्ट आणि निर्णायक मानला जात आहे.

या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना मोठा फटका बसला असून, एकत्रितपणे त्यांना केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला १६ जागा मिळाल्या असल्या, तरी सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजप निर्विवाद आघाडीवर आहे.

पुणे महानगरपालिका – पक्षनिहाय स्थिती

भाजप: १११

राष्ट्रवादी काँग्रेस: १५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): २

काँग्रेस: १६

शिवसेना (शिंदे गट): ०

शिवसेना (ठाकरे गट): १

मनसे: ०

पुण्याचा पुढील महापौर कोण?

महापौरपदासाठी निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्याआधी आरक्षणाची सोडत होणार असून, महापौरपद महिला की पुरुष आणि कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहील, यावर चित्र स्पष्ट होईल. मात्र, आरक्षण अनुकूल ठरल्यास भाजपकडून काही नावांवर गांभीर्याने विचार होण्याची शक्यता आहे.

महापौरपदासाठी चर्चेत असलेली नावं

गणेश बीडकर – निकालाआधीच शहरात त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

राजेंद्र शिळमकर – माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक

धीरज घाटे – भाजप शहराध्यक्ष, पालिकेत सदन नेते म्हणून अनुभव

या तिघांसह आणखी काही नावं चर्चेत असली तरी अंतिम निर्णय भाजप नेतृत्वाकडूनच घेतला जाणार आहे.

महत्त्वाच्या प्रभागांतील लढती

प्रभाग २४ : कसबा गणपती – के.ई.एम. हॉस्पिटल

भाजप: गणेश बीडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव

शिवसेना (शिंदे): प्रणव धंगेकर, वैशाली सागर, प्रशांत मते, मेघना तारवडे

राष्ट्रवादी (अजित पवार): सुजाता शेट्टी, पूनम कोळोखे, प्रकाश फुलावरे, विरेंद्र किराड

शिवसेना (ठाकरे): राजेश मोरे, रंजना खडके

काँग्रेस: नितीन परतानी

प्रभाग २० : शंकर महाराज मठ – बिबवेवाडी

भाजप: राजेंद्र शिळमकर, तनवी दिवेकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा मुथा

राष्ट्रवादी (अजित पवार): प्रीतम नागापुरे, अस्मिता शिंदे, रश्मी अमराळे, गौरव घुले

शिवसेना (शिंदे): बंडू जायभाय, प्रियंका शितोळे, रूपाली दारवटकर, नवनाथ निवंगुने

काँग्रेस: रूपाली बिबवे

प्रभाग २७ : नवी पेठ – पर्वती

भाजप: धीरज घाटे, अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा

राष्ट्रवादी (अजित पवार): धनंजय जाधव, दिपाली बारवकर, अक्षदा लांडगे, अशोक हरणावळ

राष्ट्रवादी (शरद पवार): रवी भामरे, प्रेमराज गदादे, राकेश क्षीरसागर

काँग्रेस: नंदू वीर, पायल काळे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

1 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

1 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

1 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

1 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

7 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

8 तास ago