महाराष्ट्र

ठाकरे गटाला दुहेरी धक्का! शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या व निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली होती.

निकालानंतर प्रकृती बिघडली

मुंबईतील पराभव स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटात शोकाकुल वातावरण होते. निकाल लागल्यानंतर काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे ठाकरे गटाला राजकीय पराभवासोबतच भावनिक आघाताचाही सामना करावा लागला आहे.

राजकीय वर्तुळातून शोकभावना

नीला देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

2 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

8 तास ago