तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवले त्यांची चौकशी केली का?काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल
नागपूर: पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
विधानसभेत आज लक्षवेधीच्या माध्यमातून रोहित आर्या प्रकरण बाबत काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी प्रश्न मांडले. आर्यांने महायुती सरकार असताना स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रोजेक्टवर काम केले होते. त्याचे पैसे सरकारने थकवले होते. त्याने व्हिडिओ काढून सांगितले माझे पैसे द्यावे ,मी दहशतवादी नाही. अस असताना रोहित आर्यांचे एन्काऊंटर का करण्यात आले? पायावर गोळी का मारली नाही? नेमकी त्याचवेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस कसा काय तिथे उपलब्ध होता? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
या प्रकरणी रोहित आर्या याने वारंवार आंदोलन केले,उपोषण करून पैसे मागितले होतें पण तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवल्याने ही घटना घडली.या प्रकरणी माजी मंत्र्यांची चौकशी केली का? सरकारकडे पैसे प्रलंबित आहे का? असा प्रश्न वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
यावेळी उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रोहित आर्याने लहान मुलांना ओलिस धरले म्हणून पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क आयोगाने समिती नेमून चौकशी करायला सांगितले त्यानुसार चौकशी सुरू आहे. यातील संबंधितावर कारवाई होईल अस आश्वासन मंत्र्यांनी दिले.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…