कोल्हापूर: प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार पाटील यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले, या प्रकल्पाच्या उद्दिष्टांच्या आराखड्यामध्ये प्रदूषण, रोजगार, स्थानिकांना अर्थिक लाभ, त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी सरकारने काही सूचना केल्या आहेत काय ? या प्रकल्पामध्ये येणाऱ्या 70 ग्रामपंचायतींनी प्रकल्पासंदर्भात आक्षेप घेतले आहेत त्याचा काही विचार केला आहे काय़ ? या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या 15 टक्के रॉयल्टीमधून ५ टक्के रक्कम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वापरले पाहीजे. स्थानिकांना वाटलेले कंपनीचे समभाग हे ‘नो लॉक पिरीयड’ असून ते ‘लॉक – इन पिरीयड’मध्ये कराव्यात जेणेकरून त्याचा फायदा भविष्यकाळात स्थानिकांना होईल.
राज्यामध्ये वेगवेगळी प्राधिकरणे तयार केली आहेत. नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक नवीन प्राधिकरण झाले. कोल्हापूरला एक प्राधिकरण झाले. महामंडळे आता पन्नास शंभर झाली असतील. आतापर्यंत आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलेला आहे. आपण एकूण राज्याच्या या सिस्टम मध्ये बघितले तर मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यामध्ये गेल्या पन्नास साठ वर्षांत स्वीकारलेली आहे, त्या व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच एखाद्या प्रकल्पाचे, एखाद्या जिल्ह्याचं अशी एक धारणा हाेत आहे. असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का? जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कमी करणार आहोत का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
गडचिरोलीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये ९३७ हेक्टर जमीन जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये पाचशे तीनशे आणि दोनशे सदतीस हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार. यामध्ये एन्वायरमेंट डिपार्टमेंटनं २६/११/२०१४ रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सिस या प्रकल्पासाठी दिले. मात्र, टर्म्स ऑफ रेफरन्सिसचं पालन कशा पद्धतीने करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्याही ठिकाणी दिसत नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित कंपनीला मिळणारा फायदा मोठा असल्याने रस्ते, रेल्वे लाईनसारख्या पायाभूत सुविधांसाठी तसेच पर हेक्टरी 2500 झाडे लावण्यासाठी कंपनीने स्वत: पुढाकार घेण्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
शेअर्सला लॉक – लिन पिरियड करा
या कंपनीने तिथल्या कामगारांना, शेतकऱ्यांना शेअर्स देण्याची भूमिका घेतली आहे. जे शेअर सहा हजार लोकांना दिलेले आहेत. त्यांना लॉक – इन पिरियड नाहीय. ज्यावेळी कंपनी ही दहा वर्षानं वीस वर्षानं मोठी येईल, त्यावेळी ते सहा हजार लोकसुद्धा तेवढेच मोठे झाले पाहिजेत. त्यामुळे या लोकांना विश्वासात घेऊन लॉक- इन पिरियड करा. दोन वर्षे काम करणाऱ्याला तुम्ही शेअर्स देणार आहात परंतु तो उद्या विकला तर त्याला काहीच राहणार नसल्याकडे सतेज पाटील यांनी लक्ष वेधले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…