महाराष्ट्र

भरधाव कारचा थरार! पाच दुचाकींना उडवले, वकील मुलीसह वडिलांचा मृत्यू

कोल्हापूर: शहरातील शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीने घातलेला थरार दोन निष्पाप जीवांच्या बळीवर थांबला. बेदरकार कारचालकाने सलग पाच दुचाकींना धडक दिल्याने वकील मुलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातानंतर संतप्त जमावाने कारचालकाची धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

या दुर्घटनेत दीपक सहदेव वंशे (62, रविवार पेठ) आणि अ‍ॅड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (30, कसबा बावडा) यांचा मृत्यू झाला. तर कैवल्य उदय नाईक (24) व धनंजय करजगार (44) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी मयुरेश योगेश पाटील (20, राजारामपुरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पहिल्या धडकेनंतर पलायन, अन् भीषण अपघात

राजारामपुरीत एका वाहनाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या मयुरेशने कार न थांबवता भरधाव वेगात शाहू मिल चौकाकडे धाव घेतली. पाठलाग होत असल्याच्या भीतीने त्याने वेग अधिक वाढवला. कोटीतीर्थकडून येणाऱ्या दुचाकींना समोरासमोर धडक देत कारने अक्षरशः फुटबॉलसारखे उडवले.

15 ते 20 फूट उडाले बाप-लेकी

वेग इतका प्रचंड होता की, दुचाकीवर असलेले दीपक वंशे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री हे रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणापलीकडे 15 ते 20 फूट उडून दगडावर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.

कार उलटी करून जखमींना बाहेर काढले

अपघातानंतर कारखाली अडकलेल्या जखमींना वाचवण्यासाठी नागरिकांनी चारचाकी उलटी केली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत चालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांचा फौजफाटा; चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अपघाताला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे सांगत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

परिसरात शोककळा

महापालिकेच्या आरोग्य विभागातून निवृत्त झालेले दीपक वंशे आणि त्यांची होतकरू वकील मुलगी भाग्यश्री यांच्या अकाली निधनाने रविवार पेठ व कसबा बावडा परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश काळजाला चिरणारा होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

59 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago