महाराष्ट्र

चक्क उकळत्या तेलात हात घालून महिला बनवते वडापाव

नाशिक: वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचं आवडतं स्ट्रीट फुड आहे. वडापाव प्रिय असणारे लोक तुम्हाल राज्यातील प्रत्येक शहरात मिळतील. त्यामुळे सर्वच शहरात वडापाव विकणाऱ्या गाड्या असतात. असाच एका वडापाव विकणाऱ्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव पेक्षा वडापाव बनविणाऱ्या महिलेची चर्चा जास्त होत आहे.

ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालत वडापाव काढते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ नाशिक येथील आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की वडापावची गाडी चालवणारी ही महिला सहजतेने उकळत्या तेलात हात घालत वडापाव काढते.

आपल्या अंगावर साधा गरम तेलाचा एखादा थेंब जरी पडला तरी आपल्याला कसं तरी होतं. मात्र ही ही महिला इतक्या सहजतेने गरम तेलात हात घालते, हे बघून कोणालाही आश्चर्य वाटणार. विशेषत: नाशिकचा चीज वडापाव खूप स्पेशल आहे. चीज वडापाव बनवणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येणार. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

5 तास ago

सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा नाहीच…

पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…

6 तास ago

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये…

6 तास ago

कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने…

20 तास ago

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत…

20 तास ago

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

2 दिवस ago