क्राईम

वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने 2 दिवसात 2 नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे.

गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चराईकरिता गेलेल्या व्यक्तीस वाघाने ठार केले. ही घटना दुपारी २ च्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर आत कक्ष क्र. ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनतर देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे आणि गडचिरोली तालुक्यात एका व्यक्तीस वाघाने ठार केले.

सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने गडचिरोलीत सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वाघाचे अस्तित्व असलेल्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असे वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेक जण सूचनांकडे डोळेझाक करतात. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago