महाराष्ट्र

महिला आरक्षण उपकार नाही, अधिकार; हर्षवर्धन सपकाळ

‘डिलिमिटेशन’च्या आड अडथळे निर्माण केल्याचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण हा कोणावर केलेला उपकार नसून तो महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असे ठाम मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’च्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “महिला आरक्षणाच्या मुखवट्याआड भाजपा सरकारचा फसलेला डाव” या विषयावरील जाहीर सभेत ते बोलत होते.

सपकाळ म्हणाले की, महिला आरक्षणाची संकल्पना स्व. राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये मांडली. त्यानंतर ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले, जे पुढे ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. पुढे सोनिया गांधी यांनीही महिला आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार घेतला. “महिलांचे स्थान केवळ ‘चूल आणि मुल’ इतकेच आहे, असा विचार भाजपा आणि संघाचा आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

कार्यक्रमाला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ऑनलाइन संबोधित करत केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे करून अंमलबजावणीला विलंब लावला आहे. “देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या भारती शर्मा यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणामुळे देशात सुमारे १४.५ लाख महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र, संसद आणि विधानमंडळात आरक्षण देताना अडथळे निर्माण झाले. “सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ लोकसभा जागांमधूनच ३३ टक्के महिला आरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.या सभेत काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कवी, कलाकारांच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रमही पार पडला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

10 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

10 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

15 तास ago