महाराष्ट्र

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे विविध मागण्या केल्या आहेत. दावे-हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, सुनावणी प्रक्रिया सुलभ करावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात SIR मोहिमेअंतर्गत ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे, म्हणजेच २१.१४ टक्के मतदार, ‘ASDD – Uncollectable’ म्हणून प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. तर प्रारूप मतदार यादीत ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ म्हणजेच ७८.८६ टक्के मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत Anomalies आणि Unmapped मतदारांचाही समावेश आहे.

या प्रक्रियेबाबत काँग्रेसने यापूर्वीही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीतही विविध सूचना मांडल्या आहेत. मात्र, काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे ॲड. कोंडविलकर यांनी पत्रात म्हटले आहे.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ :

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर हा कालावधी अपुरा आहे. याच काळात गणेशोत्सव असल्याने अनेक नागरिक गावी जातात. त्यामुळे दावे-हरकती दाखल करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवावी.

Anomalies आणि Unmapped मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करावी :

ज्या मतदारांना नोटिसा देऊन सुनावणी घेतली जाणार आहे, त्यांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी.

नोटीस प्रत्यक्ष देण्यात यावी :

गणना प्रपत्र भरून दिलेल्या मतदारांना केवळ WhatsApp वर नोटीस न देता प्रत्यक्ष भेटून नोटीस बजावण्यात यावी.

मतदार केंद्रांवरच सुनावणी घ्यावी :

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केवळ तीन-चार ठिकाणी सुनावणी न घेता संबंधित मतदार केंद्रांवर सुनावणीची व्यवस्था करावी.

मराठी-इंग्रजी नावातील किरकोळ फरकाला Anomaly मानू नये :

मराठी आणि इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ फरक असल्यास मतदाराला नोटीस न देता त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. Anomalies दुरुस्तीबाबत स्पष्ट नियमावली जाहीर करावी.

ASDD मतदारांची साध्या पद्धतीने पडताळणी करावी :

ASDD यादीतील मतदारांनी पुन्हा दावा दाखल केल्यास BLO किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यामार्फत पडताळणी करावी. अनावश्यक सुनावणीसाठी त्यांना बोलावू नये.

नवीन मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारावा :

नवीन मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारून नमुना ६, घोषणापत्र आणि नमुना ८ उपलब्ध करून द्यावेत. तसेच BLA किती अर्ज एकावेळी सादर करू शकतात, याबाबत स्पष्टता करावी.

अर्ज नाकारल्यास दोन दिवसांत लेखी निर्णय द्यावा :

सुनावणीनंतर अर्ज नाकारल्यास कारणांसह लेखी निर्णयाची प्रत दोन दिवसांत संबंधित मतदाराला द्यावी, जेणेकरून त्याला वेळेत अपील करता येईल.

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे :

ज्येष्ठ नागरिकांना नोटीस बजावल्यास त्यांच्या सुनावणीला प्राधान्य देण्यात यावे.

मयत व दुबार मतदारांची पुन्हा पडताळणी करावी :

गणना प्रपत्र आणि आवश्यक पुरावे सादर करूनही प्रारूप यादीत मयत किंवा दुबार मतदारांची नावे आढळल्यास त्यांची पुन्हा सखोल पडताळणी करावी.

SIR प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या आदेशांचे BLO आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून पालन झाले नसल्याच्या तक्रारीही असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवश्यक माहिती नियमितपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि मतदार यादीची प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, यासाठी या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

3 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

3 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

11 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

11 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

11 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago