महाराष्ट्र

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना चॅनेल बंद झाले आणि प्रेक्षक त्यांच्या केबल टीव्ही कनेक्शनवर स्टार स्पोर्ट्स चॅनल पाहू शकले नाहीत. याचं कारण चॅनेलने त्यांच्या किमतीत केलेली वाढ सांगितली जातेय. मात्र यामुळे केबल टीव्ही धारकांचे हाल होत आहेत.

1 फेब्रुवारी पासून झी, स्टार वाहिन्यांनी आपल्या चॅनेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यांनी नवीन नियमावली बनवून त्यावर सर्व केबल ऑपरेटर्स आणि डिश ऑपरेटर्सना स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. मात्र किमतीत वाढ झाल्याने केबल ऑपरेटर्सनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे आता झी, स्टारचे चॅनेल केबलवरून गायब झाले आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने सही न केल्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. झी, स्टारने केबलवरून आपले चॅनेल काढून घेतले आहेत.

केबल ऑपरेटर्सनी सही केल्यास प्रेक्षकांना आणखी जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्याला नकार दिल्याने आता चॅनेल बंद करण्यात आले आहेत. सध्या केबल टीव्ही असणाऱ्या प्रेक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढे डिश असणाऱ्या ग्राहकांकडूनही स्टार आणि झी वाहिन्यांसाठी जास्तीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.

याचा अर्थ महिन्याच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. केबल ऑपरेटर पैसे वाढीच्या विरोधात असल्याने त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. आता यातून तोडगा निघे पर्यंत केबल असणाऱ्या प्रेक्षकांना ते चॅनेल पाहता येणार नाहीत. AIDCF ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सुधारित नवीन दर आदेशाविरोधात देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

18 तास ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

1 दिवस ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

1 दिवस ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

2 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

2 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

4 दिवस ago