मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय सभेला गर्दी जमवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यात येत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुद्धा मोठी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्राने मोठा गोंधळ उडाला आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना उपस्थित राहण्याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी दिसावी म्हणूनच हे पत्र काढण्यात आल्याचा आरोप आता विरोधक करु लागले आहेत.
बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री यांची 12 सप्टेंबर रोजी पैठण मतदारसंघात सभा आयोजित केली असून आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावतील अंगणवाड्या सेविका मदतनीस यांनी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहणे बाबत गटविकास अधिकारी यांच्या सूचना आहेत. तरीही सदर कार्यक्रमास कावसानकर स्टेडियम, पैठण येथे ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…