राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील 10 घोषणा

1. लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!

3. प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

4. वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!

5. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

6. 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!

7. 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन.

9. वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

10. सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यातील 5 घोषणा

1. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. पण, मुलांना नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर मुलींप्रमाणेच मुलांनाही उच्च शिक्षण मोफत दिले जाईल.

2. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना तक्रार करण्याबद्दल कळत नाही. त्यामुळे सरकार आल्यावर तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात पोलीस ते वरिष्ठ पदांपर्यंत महिला अधिकारी असणारे विशेष पोलीस ठाणे सुरू केले जाईल.

3. अदाणींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे दिले जातील, अशी घोषणा ठाकरेंनी केली. धारावी, मुंबईत भूमिपुत्रांना माफक दरात घरे उपलब्ध करून दिले जातील,

4. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल.

5. पाच वर्षाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. दरात कोणताही बदल केला जाणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

4 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

4 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

4 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

19 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

22 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago