राजकीय

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे: विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.सिंधू हे विश्रामगृह पडघा, बोरिवली तर्फे, राहुर व शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080820 हा आहे तर ईमेल आयडी exp.observerbhiwandi@gmail.com हा आहे.

विधानसभा मतदारसंघ 139- मुरबाड, 140 – अंबरनाथ, 141 – उल्हासनगर, 142 – कल्याण पूर्व, 143-डोंबिवली या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.आशिषकुमार पांडे हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.आशिषकुमार पांडे हे रेयॉन सेंच्युरी, शहाड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080844 तर ई-मेल आयडी expenobs139to143@gmail.com हा आहे.

विधानसभा मतदारसंघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजिवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.सुरेंद्र पाल सिंग हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080892 तर ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे.

विधानसभा मतदारसंघ 148 ठाणे, 149 मुंब्रा कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.जी.मनिगंडासामी (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.जी.मनिगंडासामी हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039060688 तर ईमेल आयडी exp.observer.thane@gmail.com हा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

7 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

12 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

12 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

12 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

12 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

15 तास ago