मुख्य बातम्या

आमदार पळवण्यात आंबेगावचे कारभारी सहभागी: शरद पवार

बारामती (प्रतिनिधी): “मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” पक्षफुटीच्या वेळेस आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले आणि ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते’ अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यावर केली आहे.

यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी आल्याने सध्या महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांकडे गर्दी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातून कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामती येथे येत आहेत. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पवारांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पवारांनी पुलोद सरकारची आठवण करुन दिली.

अजित पवारांनी पक्षातील आमदार घेऊन गेल्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार म्हणाले की, “पक्षाच्या ५४ पैकी ४४ आमदारांना ते (अजित पवार) घेऊन गेले. त्या भूमिकेत आंबेगाव तालुका देखील सहभागी झाला होता. मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर (दिलीप वळसे-पाटील) काही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या, त्यांना अधिकार दिले होते, सत्ता दिली. परंतु, दुर्दैवाने त्यांनी वेगळा निर्णय घेतला. दिलेल्या सत्तेचा गैरफायदा घेतला. त्यांच्याकडून असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवार आणि दिलीप वळसे वळसे यांच्यावर टीका केल्याने ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या एकूण ८९ मतदारसंघात सभा होणार असुन वळसे पाटील यांच्या होम ग्राउंडवर सभा होण्याची शक्यता आहे. आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम विरुध्द दिलीप वळसे पाटील यांच्यात मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आंबेगावची जनता नक्की अष्टविजयाकडे जाणार की, पवारांच्या शिलेदाराला सभागृहात पाठवणार हे येणारा काळच ठरवेल.

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे: सूर्यकांत पलांडे

मोठी बातमी! शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का…

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago