राजकीय

मुख्यमंत्री शिंदेना महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन टिकवता आले नाही…

मुंबई: वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे हित साधत आहेत, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरु केली होती आणि तळेगावचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेदांत फॉक्सकॉनला सर्वोत्तम प्राधान्य दिले होते. वेदांत फॉक्सकॉनसह व्यवसायाच्या संधीची वाट पाहणाऱ्या अनेक लहान उद्योजकांची साखळी त्यामुळे आता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

नव्याने स्थापन झालेल्या ED सरकारला महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन कायम ठेवता आले नाही ही लाजिरवाणी गोष्ट असून मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती दिसून येते. त्यांनी गुजरातला बळी पडून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले आहेत, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त असून रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…

1 तास ago

पत्नीचा खून करून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाचा मृतदेह आढळला

पुणे : पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून…

1 तास ago

शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख राजू राठोड यांचे निधन; सत्तार म्हणाले, ‘विश्वासू साथीदार गमावला’

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईतील…

1 तास ago

‘चला शाळेत जाऊया’ अभियान; वरिष्ठ अधिकारी थेट शाळांच्या दारी

मुंबई: राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला ‘जवाहर बालभवन’चे व्यासपीठ; गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम

मुंबई: विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना देण्यासाठी जवाहर बालभवनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले…

2 तास ago

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि…

6 तास ago