राजकीय

एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा कारभार मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावरच…

मुंबई: महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नातूनच महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉनशी चर्चा केली होती. महाराष्ट्र सरकार व वेंदाता-फॉक्सकॉन यांच्यात अंतिम टप्प्यापर्यंतच्या वाटाघाटीही झाल्या होत्या. तसेच पुण्याजवळच्या तळेगावची जागा गुजरातमधील जागेपेक्षा जास्त फायदेशीर होती. महाराष्ट्र सरकार कडूनही या प्रकल्पासाठी चांगले पॅकेज दिले होते पण राज्यात सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला.

तळेगावमध्ये हा प्रकल्प झाला असता तर लाखो रोजगारासह त्या भागात छोट्या-मोठ्या उद्योगाची साखळी निर्माण झाली असती यातून राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला असता. पण महाराष्ट्रातील हा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये जाईपर्यंत ईडी सरकारने झोपा काढल्या आणि प्रकल्प गुजरातमध्ये गेला याचे खापर भाजपाचे नेते मविआ सरकारवर फोडत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४-१९ या सत्ताकाळात मुंबईतील प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय वित्त सेंटर, डॉकयार्ड, हिरे व्यापार गुजरातला गेला आणि आता फॉक्सकॉनही गुजरात गेला. भाजपाचे षडयंत्र पहाता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

17 तास ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

18 तास ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

2 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

2 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

4 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

4 दिवस ago