पक्ष-चिन्ह वादाच्या निर्णायक टप्प्यात शिंदेंचा सातारा दौरा; संघटनात्मक बैठका आणि जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता
मुंबई: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह वादाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील दोन दिवस ते दरेगावी मुक्कामी राहणार असून त्यांच्या या दौऱ्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक अधोरेखित करत त्यांनी अनेक कायदेशीर मुद्दे मांडले. गुरुवारीही त्यांच्याकडून युक्तिवाद सुरू राहणार आहे.
दरम्यान, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या उद्देशाने शिंदे दरेगावी आले आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “वादाचा मुख्य मुद्दा पक्षचिन्ह हे राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे?” असा असल्याचे निरीक्षण नोंदविल्याने ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना फुटीनंतर चार वर्षांनी हा वाद पुन्हा निर्णायक टप्प्यावर आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशा संवेदनशील टप्प्यावर एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा आणि त्यामागील राजकीय रणनीती काय आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…