महाराष्ट्र

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय सह-समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले की, राजकारण हे टीव्ही स्टुडिओ किंवा पत्रकार परिषदांपुरते मर्यादित नसून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात लढणे हेच खरे नेतृत्व आहे. सतत पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकरी, बेरोजगारी, महागाई, पाणी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर जनतेसोबत उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकशाहीत विरोध आवश्यक असला तरी तो सभ्य, तथ्याधारित आणि विधायक असावा, असेही शिंदे म्हणाले. वैयक्तिक टीका आणि वादग्रस्त भाषेमुळे राजकीय संस्कृती कमकुवत होत असल्याचे त्यांनी सांगितले.”जनतेला केवळ घोषणाबाजी किंवा शब्दयुद्ध नको आहे. कृती, उत्तरदायित्व आणि परिणाम देणारे नेतृत्वच जनतेच्या मनात स्थान मिळवते,” असे सांगत त्यांनी विरोधकांनी माध्यमांतील वाद बाजूला ठेवून जनतेच्या न्यायासाठी मैदानात उतरावे, असे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

18 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

2 दिवस ago