राजकीय

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई…

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यघटनेच्या संरक्षणार्थ आवाज उठवणारे लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे – फडणवीस सरकारने दाखल केला आहे. ज्या महिलेने व्हिडीओ दिला आहे तो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यात इतकी गर्दी आहे की, स्वतः वाट काढत आणि पोलीसही त्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना बाजुला करत आहेत हे दिसत आहेत. त्यात ती महिलाही आहे. अशावेळी विनयभंगाचा गुन्हा होतो का हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जितेंद्र आव्हाड हे आवाज उठवत आले आहेत. भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे हात लावून कुणाला बाजूला केले असेल तर तो विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो का? याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधी करुन घ्यावी, असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

2 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

15 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

21 तास ago