राजकीय

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार: आमदार अभिजित वंजारी

नागपूर: संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला अभिवादन करणार असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.

वंजारी म्हणाले की, उद्या नागपूर येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत आहेत. संविधान संमेलनाला संबोधित करण्याबरोबर ते दीक्षा भूमीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांचा मुंबई दौरा असून मुंबईत त्यांची सभा होणार आहे.

संविधान संमेलनाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. लोकसभेला चारशे जागा मिळाल्यावर संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली. संविधानाने आपले रक्षण केले आहे, देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळे हक्क मिळाले. उद्या नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला दोनशेहून अधिक संघटनांचा पाठिंबा आहे. या सगळ्या संघटना न्यायासाठी लढणार आहेत. संविधानाने दलित, ओबीसी ,आदिवासी, महिलांसाठी काय केले याबाबत उद्या चर्चा होणार आहे.

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संविधान संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात संविधान, संविधानाने समाजातील विविध घटकांना दिलेले हक्क, महिलांचे अधिकार, शिवशाही आणि संविधान अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

5 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

9 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 दिवस ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago