राजकीय

सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक करण्याचा प्रयत्न केला जाईल

मुंबई: अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नाही. ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तमपध्दतीने काम सुरू झाले आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने… संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आमच्या अपवादात्मक संख्या एबी फॉर्मसंदर्भात आहेत. अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. एक – दोन दिवसात नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ असे सुनिल तटकरे म्हणाले.

देवळाली ही जागा राष्ट्रवादीची असून त्याठिकाणी सरोज अहिरे या आमच्या महायुतीच्या उमेदवार आहेत. हेमंत गोडसे यांच्या ज्या काही भावना असतील. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की ती समजूत काढण्यात यशस्वी होतील.

पवारसाहेबांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतानाच बारामतीची जनता सूज्ञ आहे. ३० वर्षात अजितदादांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पूणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत आहे. देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते. त्यामधील अजितदादांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देऊ मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजितदादा निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे कधी -कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात. कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असा जोरदार टोला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

कॉंग्रेसला लोकसभेला मिळालेले यश कितीपध्दतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये काल कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला असा खोचक टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago