राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र सुपूर्त
कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): सणसवाडी (ता.शिरुर) येथील नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांची खुद्द राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तळागाळातील सच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील रामदास दरेकर हे राज ठाकरे यांच्या विचारांना माननारे, तसेच त्यांच्या विचारांना ग्रामीण भागात विशेषतः शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात पोचवणारे निष्ठावान कार्यकर्ते व सहकारी म्हणून ओळख असलेल्या दरेकर यांचे सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे नाते आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात विविध पदावर काम करत आपल्या कामाच्या माध्यमातून पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत त्यांनी हजारो कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून सर्वसामान्य माणसांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम रामदास दरेकर करत आहेत. मनसे पक्ष स्थापन झाल्यावर राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पत्नी सविता रामदास दरेकर या पंचायत समिती सदस्या म्हणुन निवडून आल्या होत्या. मनसेच्या राज्यातील पहिल्या सदस्य होण्याचा बहुमान मिळवत त्यांनी इतिहास रचला होता. रामदास दरेकर यांच्या वहिनी सुनंदा नवनाथ दरेकर यांनी उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवले असून सध्या त्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत.
रामदास दरेकर हे राजकीय ,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात याचीच पोहच पावती म्हणून खुद्द राज ठाकरे यांनी मनसे जिल्हाध्यक्षपदी यांची निवड करत त्यांना स्वहस्ते निवडीचे पत्र दिले. राज ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागात पोचण्याविण्यासाठी तसेच मनसेचा पक्ष विस्तार करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम करणार असल्याचे रामदास दरेकर यांनी निवडीनंतर सांगितले.
यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, सरचिटणीस अजय शिंदे, सरचिटणीस बाळा शेडगे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजकीय तसेच सामाजिक स्तरातून रामदास दरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…