राजकीय

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला. मात्र आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या आपल्याकडे असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘मी माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तुमचे छंद तसे आहेत का? पाण्यात म्हैस अन् बाजारात मोर अशी परिस्थिती आहे. आढळराव पाटील बोलतात एक अन् करतात दुसरंच. ते आता पवारांच्या संपर्कात आहेत.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago