शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मनोज युवराज टेमगिरे (रा. बुरूजवाडी, मलठण रोड, ता. शिरूर) यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच १२ एफव्ही ०६३२) ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी दिली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या. त्यानुसार शिक्रापूर गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने रेकॉर्डवरील आरोपी योगेश ज्ञानेश्वर जाधव (वय २७, रा. कासारी फाटा, शिक्रापूर, मूळ रा. लोणीधामणी, ता. आंबेगाव) याच्यावर गुप्त पाळत ठेवली.
संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने शिक्रापूर परिसरातील आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. न्यायालयाने मंजूर केलेल्या पोलीस कोठडीत सखोल चौकशीदरम्यान आरोपीकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जनार्धन शेळके, तुषार पंदारे, संजू जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, बापू हाडगळे, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांनी सहभाग घेतला.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते…
मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील…
शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.…
मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…