Shirur Police Station
शिरूर : शिरूर पोलिसांनी निमोणे गावाच्या हद्दीतील भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ) व (ई) अन्वये गुन्हा क्रमांक ५९०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंटू नघू गव्हाणे व अतुल गि-हे (दोघे रा. दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ जून रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजता छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान ४०० लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन, ५ लिटर तयार गावठी दारू, दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य व इतर मिळून ४३,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी पोलिस अंमलदार नितेश दत्तात्रय थोरात यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहेत.
शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात
निमोणे गावठाणात गावठी दारुचा सुळसुळाट; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनधिकृत विक्री सुरु
Video; शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारु उध्वस्त
शिरूर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम; गावठी आणि विदेशी दारू जप्त
शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…