शिरूर तालुका

उद्योगपती स्व रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त 423 रक्त संकलित

शिरुर (मुकुंद ढोबळे): उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरुर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 423 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

स्व.रसिकभाऊ माणिकचंद धारिवाल यांच्या जयंतनिमित्त उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल मित्र मंडळ व मोरया जीम हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल तसेच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, उपनगराध्यक्ष जाकिर खान पठाण, शिरुर नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे, रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, , प्रकाश धारिवाल मित्र मंडळाचे प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, संतोष शितोळे, मोरया जिमचे योगेश जामदार, सुशांत कुटे, सागर पांढरकामे, मुजफ्फर कुरेशी, किरण बनकर, विशाल जोगदंड आदींनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

दरम्यान, नागरिकांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रत्येक सहभागी रक्तदात्यास प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह व एक भेटवस्तू देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.अर्पण ब्लड बँक नगर, ससून रुग्णालय पुणे, आनंद ब्लड बँक अहमदनगर,आदींचे रक्तदान शिबीरास विशेष सहकार्य लाभले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

38 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago