महाराष्ट्र

मुंबईत “जनता दल (सेक्युलर) च्या वतीने वीज बिलाची होळी

मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्तावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. सरकार वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे.

या विरोधात शासनाने हा निर्णय मागे घेऊन मागील वीज दराप्रमाणे वीजदर आकारावा,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, पत्रकार यांच्यावर होणारे हल्ले याविषयी कडक कायदा करावा, अशा विविध मागण्या घेऊन जनता दल सेक्युलर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोर्चा मध्ये महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास बने, महासचिव ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, स्मृती जाधव, हरिदास सागरे, जमील उद्दीन शेख, सुरेंद्र कुंज्जीकर , ताराबाई मेश्राम, भगवान साळवी, आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

8 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

20 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

21 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago