शिरूर तालुका

Video: सणसवाडीत औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग

आगीमध्ये तब्बल दोन कोटींचे नुकसान, दोन तासाने आग आटोक्यात

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ प्लास्टिक या कंपनीला (दि. १०) जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली असून तब्बल २ तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाच्या तीन पथकांच्या प्रयत्नाने आग विजवण्यात यश आले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मात्र कंपनीचे तब्बल २ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल & टी फाटा परिसरातील श्रीनाथ प्लास्टिक कंपनीमधील कामगार कंपनीत काम करत असताना वेल्डिंगचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अचानकपणे आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केले. यावेळी सर्व कामगार आरडाओरडा करत कंपनीच्या बाहेर पळाले काही वेळात आगीने मोठा पेट घेतला अन आगीचा धूर दोन किलोमीटर अंतरावरुन दिसू लागला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलीस शिपाई अमोल रासकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर, पोलीस मित्र पप्पू सासवडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न सुरु केला.

unique international school

दरम्यान कंपनीमधील सिलेंडर तसेच शेजारी असलेल्या विद्युत रोहीत्राचे स्पोट झाले. काही वेळात रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप पावणे, भाऊसाहेब बागुल, बाळू पवार, सचिन मिसाळ, शुभम यादव तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे विजय महाजन, संदीप शेळके, नितीन माने, मयूर गोसावी, चेतन खमसे, उमेश फाळके, विकास पालवे, अभिजित दराडे, संदीप तांबे, ओम पाटील, प्रशांत अडसूळ यांचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजाविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान पोलीस मित्र पप्पू सासवडे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. तब्बल २ तासांच्या अथक परिश्रमानंतर सदर ठिकाणची आग आटोक्यात आली. मात्र आगीमध्ये कंपनीतील सर्व मशिनरी तसेच साहित्य जळून खाक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

औद्योगिक वसाहतच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी…
शिक्रापूर सह परिसरात सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप यांसह आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून अनेकदा येथे आगीच्या घटना घडत आहेत. परंतु घटना घडल्यानंतर अग्निशामक यंत्रणा रांजणगाव अथवा वाघोली येथून येई पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे आगीचे व नुकसानीचे प्रमाण वाढते. त्यामुळे शासनाने औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी, अशी मागणी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…

5 तास ago

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर होणार; ‘आधी मोजणी, मग रजिस्ट्री’ची नवी व्यवस्था

मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील…

5 तास ago

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…

5 तास ago

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी…

5 तास ago

मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते; सोनिया गांधींचीही परवानगी, पण मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…

5 तास ago

बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…

5 तास ago