शिरूर तालुका

शिरूरमध्ये भगव्या शिवभक्तीचा महाप्रवाह, श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाला दिड लाख भाविक

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाला रात्री बारा वाजल्यापासून मोठी रीघ लागली असून अंदाजे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे .यंदाही शहरात भक्तिभावाने आणि उत्साहाने शिवमय वातावरण निर्माण केले होते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष असल्याने उत्सव अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला. जुने शिरूर येथील रामलिंग मंदिरात प्रंचड गर्दी होती. सुमारे दिड लाख भाविकांनी श्रीराम लिंग महाराजांचे दर्शन घेतले. शिरूर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता.

रामलिंग महाराजांच्या पालखीची शाही मिरवणुकीचा भव्य थाटात संपन्न झाली. अग्रभागी मानाचा अश्व, त्यापाठोपाठ भगवे फेटे परिधान केलेले मानकरी आणि स्वयंसेवक, टाळ-मृदंगांचा गजर, “रामलिंग महाराज की जय”च्या गर्जना आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. छत्र-चामरे घेऊन सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांची भव्यता आणि भगवे निशाण घेऊन सज्ज असलेल्या निशाणदारांनी मिरवणुकीला दैवी तेजस्विता प्राप्त करून दिली. पंचक्रोशीतील महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या, तर मखमली वस्त्रांनी अलंकृत आणि फुलमाळांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीत श्री रामलिंग महाराजांची प्रतिमा विराजमान झाली.

शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या होत्या. भगव्या पताका आणि झेंड्यांनी सजवलेल्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. विविध मंडळांनी “शिवमहिमा” या विषयावर देखावे सादर करून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.

श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते शिवसेवा मंदिरात महाआरतीनंतर पालखीत प्रतिमा विराजमान करण्यात आली. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक पवार, युवा नेते आदित्य धारिवाल यांच्यासह शहर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. नगर परिषदेच्या वतीने प्रमुख मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मानाचे फेटे बांधून गौरवण्यात आले.

अखंड बारा तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीचा समारोप रात्री उशिरा, जुने शिरूर येथे, पाच तोफांच्या सलामीसह करण्यात आला. शिरूर शहराने या वर्षीचा पालखी सोहळा ऐतिहासिक बनवला असून, उत्सवाची परंपरा अधिक भव्य स्वरूपात पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. (दि. २७) रोजी भव्य बेलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

6 तास ago