शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील दोन महत्त्वाचे रस्ते अखेर खुले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तब्बल जवळपास ४० वर्षे बंद असलेले कवठे येमाई – पांडव करी गणेशनगर ते फाकटे आणि निमगाव म्हाळुंगी – कासारी हे दोन महत्त्वाचे रस्ते अखेर शिरूर तहसिल कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांमुळे खुले झाले आहेत. या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

कवठे येमाई येथील पांडव करी गणेशनगर ते फाकटे हा १.५ किमी लांबीचा पाणंद रस्ता जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण आणि अडथळ्यांमुळे बंद होता. महसूल प्रशासनाने विशेष पुढाकार घेत अखेर हा रस्ता खुला केला आहे. तसेच, निमगाव म्हाळुंगी ते कासारी हा ५ किमी लांबीचा शिवरस्ता तब्बल २५ वर्षांपासून बंद होता. प्रशासनाने आतापर्यंत २ किमी अंतराचा रस्ता मोकळा केला असून उर्वरित ३ किमी लवकरच पूर्ण केला जाणार आहे.

रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सोय निर्माण झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात महसूल प्रशासनाने मोठी भूमिका बजावली आहे. या उपक्रमात मंडल अधिकारी माधुरी बागले, मंडल अधिकारी तावरे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी रामदास आरदवाड, मनिषा राऊत, मनिषा भालेराव, आबासाहेब रूके, संतोष पोटावळे यांसह ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. लवकरच या भागातील सर्व प्रमुख रस्ते खुले होतील, अशी आशा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या आदेशानुसार व प्रांत अधिकारी पुनम अहिरे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज गतीने सुरू असून, उर्वरित शिवरस्ते, पाणंद रस्तेही ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच खुले करण्यात येतील.

माधुरी बागले

मंडल अधिकारी मलठण, तळेगाव ढमढेरे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

6 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

6 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

6 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

9 तास ago