शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील नानास्पॉट परिसरात रविवार (दि ११) सायंकाळी घडलेल्या अपघातात मोठी दुर्घटना टळली. अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करत चारचाकी गाडीला कट मारल्याने समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत किशोर गणेशलाल सरवैये (वय ६६, रा. बसैयेनगर, संभाजीनगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
सरवैये हे कुटुंबीयांसह पुणे येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. विधी आटोपून ते ११ जानेवारी रोजी दुपारी पुण्याहून संभाजीनगरकडे ह्युंदाई कारने (एम एच २० बी वाय २१२६) कारने निघाले होते. सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता शिरुर गावच्या हद्दीतील नानास्पॉटजवळील उतारावर, मागून आलेल्या अज्ञात ट्रकने कारला उजव्या बाजूने अचानक कट मारला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून कार समोर रस्त्यावर कोणताही सिग्नल किंवा अडथळा न लावता उभ्या असलेल्या कंटेनर (एच आर ३८ ए डी ६३३०) ला जोरात धडकली.
या कारमध्ये किशोर सरवैये यांच्यासह पत्नी, बहीण, भावजय व पुतण्या असे सहा जण होते. सुदैवाने सर्वजण बचावले, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार विशाल कोथळकर करत आहेत.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …