शिरूर तालुका

‘भिक्षा नको, सुरक्षा दया’ रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई बदलापुर येथील चिमुकलीच वय ३ वर्षे ८ महिने या वयात शी व शूची फारशी समजही आलेली नसते. याच वयात शु करायला जात असतांना शाळेतल्याच एका राक्षसी वृत्तीच्या ‘काका’ ने नको त्या वयात नको त्या यातना दिलेल्या असतात. या मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाले. हि घटना लाज आणि संताप या पलीकडची आहे. त्यामुळे आम्हाला ‘भिक्षा नको तर सुरक्षा द्या अशी संतप्त मागणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

 

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. आता या घटनेचे पडसाद सर्व ठिकाणी उमटले असुन त्याबाबत निदर्शने पण झाली. यात चौकशी होऊन नंतर सर्व काही ठिक होईल. पण या घटनेचे ओरखडे त्या चिमुकल्या कोवळ्या मनांवर आणि आई बापाच्या काळजावर जन्मभर राहतील. त्याच काय…? असा सवाल कर्डीले यांनी उपस्थित केला.

 

तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, देशात आज शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली आणि महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडून गेल्यानंतर आरोपीना शिक्षा होईल. पण ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांच्या पुढच्या आयुष्याच काय…? अशा नराधमांना जागीच भर चौकात जाळले पाहिजे. तेव्हा त्यांना वेदना काय असतात ते समजेल देशात व राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.

 

त्यामुळेच प्रशासनाला विनंती आहे की, ‘आंम्हाला तुमच्या योजना नको, पैसा नको. परंतु अशा नीच प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी साम, दाम ,दंड,भेद वापरा पण आम्हाला सुरक्षा द्या. यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद,गीता आढाव, संगीता शेवाळे, सविता बोरुडे, मंगल गायकवाड, दुर्गा ननवरे, मनीषा टेभेंकर आदी महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago