शिरुर तालुक्यातील त्या गायरान अतिक्रमणाबाबत प्रशासन अलर्ट

मांडवगण फराटा (संपत कारकूड): जिल्हाधिकाऱ्यांकडून (दि. ४) नोव्हेंबर २०२२ रोजी गायरान अतिक्रमण काढण्याबाबत पारित झालेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व हालचाली संबंधित कार्यलयातून चालू झाल्या असून गटविकास अधिकारी ते ग्रामपंचात दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस प्रक्रिया चालू झाली काही ग्रामपंचात नवीन अतिक्रमांचा डेटा गोळा करीत असून २०११ नंतरच्या सर्व अतिक्रमणांचा या कारवाईत समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनीवर नेमके किती अतिक्रमण केले याची आकडेवारी शासनाला सुद्धा अंदाजे सांगावी लागत असून अतिक्रमनासारख्या गंभीर विषयाकडे शासन आणि प्रशासनाने मिळून केलेली डोळेझाक हेच कारण अतिक्रमणाला कारणीभूत ठरली असून सगळीकडे १०० टक्के अतिक्रण झालेले प्रत्यक्ष दिसून येत असून या पुढील काळात गाव-गावात सामाजिक प्रयोजनालाच जागा शिल्लक नसल्याची गंभीर बाब या अतिक्रमण कारवाई निमित्त समोर येत आहे. जिल्यात असे कोणतेही गाव सापडणार नाही, कि तेथे सरकारी जमीनीवर अतिक्रमण झालेले दिसून येत नाही. गेली 40 वर्षांपासून अतिक्रमणाचा आकडा वाढला असून अतिक्रमांवर अद्याप ठोस कारवाई केल्याचे ऐकण्यात नाही.

अतिक्रमणासाठी मोकळे कुरण मिळाल्यावर नागरिकांनी वाट्टेल तसे अतिक्रमण केले यावर कुणाचे हि नियंत्रण राहिले नाही, आणि हेच अतिक्रमण ग्रामपंचायतीने कर प्राप्त उत्पन्न मिळावे म्हणून आपल्या दफ्तरी नोंद केले येथून पुढेच सरकारी जमिनीवर अतिक्रमन धारकांनी आपला मालकी समजून काँक्रीटचे जंगल उभे केले. हे जंगल हटविणे शासन आणि प्रशासनाला अत्यंत अवघड जागेवरील दुखणे झाले असून हे काम उरकणार नाही, असेच दिसते. स्थानिक नेत्यांना अतिक्रमण काढले गेले पाहिजे, असे अजिबात वाटत नाही तर प्रशासन मात्र सरकारी आदेशाने कारवाईसाठी बांधील आहेत. आता सुप्रीम निर्णयाची कितपत अंमलबजावणी होते, हे आता पुढील काळात पाहावे लागणार आहे.

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago