शिरूर तालुका

पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. युवराज थोरात यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनाला राज्यभरातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्याध्यक्ष अनिलजी पलांडे यांनी शिक्षक संघटनेसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व संघटनेची वाढ घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी “संघटना नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असून पुढील काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे मत व्यक्त केले.

जुने मार्गदर्शक आबा धुमाळ, गजाननराव पाटील यांच्यासह राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव ठोंबरे, विभागीय कार्याध्यक्ष शांतारामजी नेहरे यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांसोबत शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सभासद वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

अधिवेशनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, बहुमताने जिल्हाध्यक्षपदी युवराज थोरात यांची निवड करण्यात आली. त्यांनी निवडीनंतर “शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहीन,” असे आश्वासन दिले.

या अधिवेशनात कार्याध्यक्ष, सरचिटणीस व कोषाध्यक्ष या पदांवर माळशिरस सर व कोळी सर यांची तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लोंढे मॅडम यांची बिनविरोध निवड झाली. महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीवर राज्य प्रतिनिधी म्हणून वंदनाताई पाचरणे मॅडम यांची निवड होणे हीही अधिवेशनाची विशेष बाब ठरली.

कार्यक्रमाचे नियोजन शिरूर तालुक्याचे कार्याध्यक्ष कल्याणराव कोकाटे, महिला तालुकाध्यक्ष शोभा तिकांडे, माजी अध्यक्ष सविता भोगावडे, माजी जिल्हाध्यक्ष सुप्रिया नवले व नीता परदेशी यांनी केले. तसेच त्रिंबकराव भाकरे, पोपटराव गांधी, सखाराम फंड, विजयराव गोडसे, संतोष विधाटे, नितेश वाकडे, म्हातारबा बारहाते, रामचंद्र नवले, चंद्रकांत खैरे, अंजली शिंदे, प्रकाश नरवडे, उमेश धुमाळ, हंबीर सर, ज्ञानेश्वर पवार, देवराम घोडे, प्रदीप थोरात, नाना धुमाळ, संपतराव शिंदे, सूर्यकांत डफळ, संतोष शेळके, बापू घोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्षांमध्ये वेल्हेचे रवींद्र कोहिनकर, मुळशीचे दत्तात्रेय मुंडे सर, हवेलीचे जोंधळे सर, खेड तालुक्याचे अध्यक्ष नारायणजी करपे, तसेच खेडचे माजी सरचिटणीस नामदेवराव गायकवाड, बाबाजी शिंदे, दत्तात्रेय शिंदे, महादेव बाजारे, मंगेश येवले, सुनील भुजबळ, निलेश गायकवाड आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.अधिवेशनात विशेष जीवनगौरव पुरस्कार खेडचे नामदेवराव गायकवाड व शिरूरचे नाथू वीर सर यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदन खेडचे माजी सभापती व माजी चेअरमन तुषारजी वाटेकर यांनी उत्कृष्टपणे केले, तर पोपटराव इंगवले यांनी आपल्या प्रभावी शब्दांतून उपस्थितांचे स्वागत करून अधिवेशनाला संस्मरणीय स्वरूप दिले.एकूणच, या त्रैवार्षिक अधिवेशनाने पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या कार्याला नवचैतन्य प्राप्त झाले असून नव्या कार्यकारिणीकडून शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago