शिरूर तालुका

शिरुर शहरातील गोरक्षक अजिंक्य तारु यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ पदी नियुक्ती

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील सामाजिक, धार्मिक आणि गोरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” अंतर्गत मानद प्राणी कल्याण अधिकारी या अत्यंत सन्माननीय पदावर नियुक्ती झाली आहे.

या निवडीमुळे शिरुर शहर, तालुका तसेच संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन विविध सामाजिक संघटना, नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि गोरक्षण प्रेमींनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत आणि अभिनंदन केले आहे. हि नियुक्ती म्हणजे त्यांच्या दीर्घकाळाच्या प्रामाणिक कार्याची शासनाकडून मिळालेली अधिकृत पोचपावती मानली जात आहे

गोरक्षणाच्या चळवळीत अग्रस्थानी…

अजिंक्य तारु हे गेली अनेक वर्षे शिरुर शहर व परिसरात गोहत्येच्या विरोधात, गोवंश रक्षणासाठी आणि प्राण्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांनी अनेकवेळा स्थानिक पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून गोरक्षणाच्या बाबतीत कार्यवाई घडवून आणली आहे. गायींचे अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करणे, अपघातग्रस्त जनावरांना वाचवणे, त्यांची वैद्यकीय मदत मिळवून देणे, अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आज अनेक युवक गोरक्षण आणि प्राणीमित्र म्हणून पुढे येत आहेत.

या नियुक्तीनंतर बोलताना अजिंक्य तारु म्हणाले, “माझ्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली, याचा मला मनस्वी अभिमान वाटतो. मी आजवर ज्या निष्ठेने गोरक्षणासाठी झटत होतो, त्या कार्याला आता एक अधिकृत ओळख मिळाली आहे. पुढेही संपूर्ण ताकदीने मी प्राणी कल्याणासाठी, गोवंश संरक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी कार्यरत राहीन. ही संधी मला अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देते.”

शिरुर शहरातून अभिनंदनाचा वर्षाव

शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, धर्मप्रेमी मंडळी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी अजिंक्य तारु यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन आणि सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनंदन केले. शिरूर शहरात अशी नियुक्ती होणे ही स्थानिकांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

भविष्यातील योजना आणि जनजागृती…

नवीन जबाबदारीनंतर अजिंक्य तारु यांनी सांगितले की, ते शाळा-महाविद्यालयांमध्ये प्राणी कल्याण जनजागृती कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात प्रभावी उपाययोजना, फिरती जनजागृती मोहिमा, तसेच आपत्तीच्या काळात प्राण्यांना मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर टीम तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

10 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago