पाबळ (सुनिल जिते): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापनदिन मलठण शाखेत मोठया उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने बँकेच्या ग्राहकांना व गावातील पदाधिकारी,महिला व जेष्ठांना निमंत्रित करण्यात आले होते.प्राचार्य अनिल शिंदे,माजी चेअरमन शरद गीते,बबनराव गायकवाड,दिलीप महाले, मोहन लष्करे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, पेन्शनर संघटनेचे सचिव आनंदराव वेताळ,सचिन शिंदे,सचिव सुनील जिते,चेअरमन आबा जाधव,राजेंद्र माशेरे,बिरा शिंदे,वैभव थोरात आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब,अर्थमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार,आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले काम करीत असून,विविध योजनांचा लाभ शेतकरी, महिला व युवकांना होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी ही बँक संबंधित असून,आम्हांला बॅंकेचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य अनिल शिंदे यांनी यावेळी काढले. यावेळी उत्तम सेवा देत असल्याबद्दल शाखाधिकारी सुनील शिंदे, रोखपाल अमित शिंदे,लेखनिक अक्षय मगर,कर्मचारी अक्षय शिंदे यांचा उपस्थितांनी शाल,श्रीफळ देऊन सन्मान केला.बँकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांना रोपटी भेट देण्यात आली. शाखाधिकारी सुनील शिंदे यांनी स्वागत केले. अमित शिंदे यांनी प्रास्ताविक व अक्षय मगर यांनी आभार मानले.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…