शिरूर तालुका

शंभर वर्षे जगायचे तर जंक फूड टाळा; डॉ. नामदेव नरवडे

पाबळ: विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई प्रशालेत नुकतीच गणेशोत्सव व्याख्यानमाला पार पडली. यावेळी आजार व कुटुंबापुढील समस्या या विषयावर व्याख्यान देताना सध्या जंक फूड मुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे.

मुलांची भूक मंदावत आहे व मुलांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे . हे सर्व चुकीच्या आहाराचे परिणाम आहेत. तसेच स्टिंग सारख्या पेयांमुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळेभविष्यात मुले व्यसनाच्या आहारी जातील असे डॉक्टर नामदेव नरवडे यांनी प्रबोधन करताना सांगितले. कान्हूर मेसाई प्रशालेत दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या विषयांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावेळी रमेश रोहोकले सर यांचे ‘आई मायेचा गाभारा’ व वर्षा पुंडे यांचे ‘आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ‘या विषयावर व्याख्याने झाली.

यावेळी विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा अंजली घोलप, उपाध्यक्ष तानाजी खर्डे ,सचिव सदाशिव पुंडे ,सहसचिव बाळासाहेब पुंडे, संचालक दादासाहेब खर्डे, उद्योजक रोहिदास ढगे, संतोष घोलप, अनिल चौधरी, रतन तळोले, प्रदीप पुंडे, अमोल पुंडे, रमेश खर्डे , विलास तळोले , पोपटराव तळोले, अण्णा साकोरे, मुख्याध्यापक विनोद शिंदे ,पर्यवेक्षक मनोज धुमाळ, बाजीराव पुंडे , राजाराम दळवी, दत्तात्रेय खोडदे , शहाजी दळवी व प्रशालेतील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर वृंदआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मछिंद्र राऊत यांनी केले. चंद्रकांत धुमाळ यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

16 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago