शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. न्हावरे) यांच्या घरी ही घटना घडली. त्यावेळी आरोपी – त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे,साधना शंकर देशमुख, यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे)यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवला.
शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु झालेल्या वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका व रूपाली यांच्या केसाला धरून ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्रिंबक हिंगे याने महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावरही हातातील काठीने हल्ला करत गंभीर दुखापत केली. प्रियंका हिला देखील डोक्यात व हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली गेली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहे. या प्रकारामुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतजमिनीच्या वादामुळे वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …