शिरूर तालुका

शिक्रापुरात ग्राहक पंचायतची बैठक संपन्न

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नवनिर्वाचितांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत निवडीचे पत्र देय सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बैठकी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद व स्वर्गीय संतोषबापू गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मध्य महाराष्ट्रात प्रांत सहसंघटन मंत्री रमेश टाकळकर, पुणे जिल्हा पालकमंत्री भानुदास सरडे, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर, सचिव संतोष शिर्के यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पार पडलेल्या बैठकीत पुणे जिल्हा सहसंघटक पदी देवेंद्र जगताप, शिरुर तालुका पालकपदी तुकाराम फराटे, शिरुर तालुकाध्यक्ष पदी संपत फराटे, शिरूर तालुका संघटन मंत्रीपदी पर्वतराज नाबगे, सचिवपदी पंकज बांगर, उपाध्यक्षपदी अशोक मोरे, कोषाध्यक्षपदी विशाल गव्हाणे, महिलाध्यक्षपदी रोहिणी दरेकर, सहसंघटन मंत्री पदी रामदास दरेकर तर कार्यकारिणी सदस्यपदी पंडित मासळकर, अशोक बेंडभर, शिरूर शहर संघटकपदी किरण गांधी यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

दरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचा मूळ उद्देश ग्राहकाचे हित जोपासणे असून पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी चोख पार पाडत संघटनेला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी असे देखील पालकमंत्री भानुदास सरडे यांनी सांगितले. दरम्यान शिरूर शहर संघटक किरण गांधी यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

15 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

23 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago