शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरूर) येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आणि प्रणिता रामदास ढोकले असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
करंदी (ता. शिरूर) येथील वाघोलीतील रायसोनी कॉलेज या महाविद्यालयात शिक्षण घेणारी प्रणिता ढोकले ही रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये अभ्यास करत होती. काही वेळाने तिने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर प्रणिताचा भाऊ घरी आला त्याने दरवाजा वाजवला मात्र प्रणिताने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करुन पाहिले असता प्रणिता हिने घरातील छताच्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान प्रणिता हिला शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी प्रणिता रामदास ढोकले (वय १९) रा. करंदी माळवस्ती (ता. शिरूर) जि. पुणे या युवतीचा मृत्यू झाला असून याबाबत संतोष तात्याबा ढोकले (वय ४४) रा. करंदी माळवस्ती (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…