शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने शाळेतील मुलांसाठी स्तुत्य उपक्रम

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुतांशी गरिबांचीच मुलं शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबतच भौतिक सुविधा पण महत्वाच्या आहेत. कडाक्याच्या थंडीत मुलांना बसायला व्यवस्थित असेल तर त्यांचे अभ्यासात  व्यवस्थित लक्ष लागेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

 

सध्या सगळीकडे थंडीचा कडाका वाढला असुन रामलिंग येथील प्राथमिक शाळेतील मुलांना वर्गात फरशीवर बसावे लागत असल्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाळेतील गरजु मुलांना बसण्यासाठी बस्कर पट्या देण्यात आल्या यावेळी त्या बोलत होत्या.

 

पुढे बोलताना कर्डीले म्हणाल्या, समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्यातील काहीजण दानपेटीत गुप्तदान करतात. परंतु असे न करता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली तर खूप मोठे दान होईल आणि यातून नवीन पिढी घडेल. म्हणूनच प्रत्येकाला जसे जमेल तसे जिथे गरज आहे तिथे सहकार्य करता आले पाहिजे.

 

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था नेहमीच समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असते. रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी बहुतांशी मुलांचे पालक मजुर आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.

 

त्यामुळे शाळेतील इयत्ता 1 ली आणि 2 री तील मुलांना थंडी मध्ये फरशीवर बसताना त्रास होऊ नये म्हणून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी या मुलांना बसण्यासाठी बस्कर पट्टी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सर्व मुलांचा थंडीपासुन बचाव होणार आहे. यावेळी राधा रेपाळे,निकिता देव्हाडे, शिक्षक लाळगे, वाघमारे ,जगदाळे आदी उपस्थित होते.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago