शिरूर तालुका

शेकडो दिव्यांनी उजळून निघाला गुनाटचा दत्त मंदिर परिसर…

शिरुर (सतीश डोंगरे): दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गुनाट येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांनी दत्त मंदिर परिसर उजळून निघाला होता.

श्री दत्त देवस्थान ट्रस्ट आणि गुनाट ग्रामस्थांच्यवतीने यंदा प्रथमच या अनोख्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिपोत्सवाचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी लक्ष्मीपूजनानिमित्त हजारो भाविकांनी दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन घेतले. शेतकरी वर्गावर आलेले संकट दूर करुन सर्वांना सुखात, आनंदात ठेवा, अशी मनोकामना करत दत्त मंदिरात दीपोत्सव पार पडला.

यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता. यावेळी दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. “ दिव्यांच्या प्रकाशाने दत्तप्रभूंच्या साक्षीने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त व्हावी या हेतूने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते” असे दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. गणेश कर्पे यांनी सांगितले.

यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे, सरपंच संदेश करपे, पोलीस पाटील हनुमंत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बहिरट, सतीश सोनवणे, कृषी सहायक जयवंत भगत, भाऊसो गाडे गुरुजी, संस्कार ग्रुपचे अध्यक्ष मनोज गव्हाणे, श्यामकांत गोरडे, अंकुश करपे, संतोष करपे, वैभव करपे, आबा गाडे, अविनाश घावटे, संभाजी गाडे व दत्त भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago