शिरूर तालुका

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे येथील घोड धरणातून नदीपात्रात नुकतेच पाच हजार २०० क्युसेकने पाणी सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.

hotel matoshree ranjangaon ganpati

दरम्यान, घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र धरणातून पाणी सोडल्यामुळे आता काही प्रमाणात ऊस लागवडीला गती येईल. अद्यापही वडज, येडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून ज्या प्रमाणात वरुन पाणी येईल त्याप्रमाणे घोडमधून खाली नदीपात्रात पाणी सोडले जाईल. आहुपे खोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. धरणामध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो. दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घ्यावी, असे आवाहन घोड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, घोड धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाणी साठवण क्षमता कमालीची गाठली आहे, असा अहवाल नाशिक येथील मेरी संस्थेनी यापूर्वीच दिला आहे. मात्र गाळ काढण्याबाबत ठोस निर्णय होत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

11 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

11 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

17 तास ago