शिरूर तालुका

माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेह मेळावा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या वतीने वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवले जात असताना नुकतेच माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेहमेळावा संपन्न झाला असून महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांगांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका वतीने सिस्टर लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दिव्यांग स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माहेर संस्थेचे शरली अँथनी, रमेश दुतोंडे, आनंद सागर, विजय तवर, संजय इंगळे, तेजस्विनी पवार, सुमित इंगळे, अनिता गायकवाड, गायत्री निर्मळ, अनिता जाधव, अर्चना घुंडरे, जान्हवी बोत्रे, नितू पाटील, रघूनाथ सातव, किरण शिंपी, सतिष आळकूटे, जिवन टोपे, राजेंद्र सुपेकर, नवनाथ वरपे, पिंपरी चिंचवड हॅन्डिकॅप सेंटरचे अध्यक्ष किसन खंडागळे, सुनिल चोरडिया, डॉ. सोमनाथ मोरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी परिसरातील दिव्यांग बांधवांनी मेळाव्यात सहभाग घेतला असताना दिव्यांगांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करुन डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांगांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान अनेक दिव्यांग लोकांनी त्यांचे अनुभव लोकांना सांगितले. यावेळी दिव्यांगांना दिव्यांग योजनांबाबत मार्गदर्शन करुन माहेर संस्थेच्या वतीने भेटवस्तू वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इंगळे यांनी केले तर रमेश दुतोंडे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

6 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago