शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रविवार (दि २१) रोजी भाद्रपद बैलपोळा सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी ताशा आणि सनई या पारंपारिक वाद्याच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. परंतु पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे डीजेच्या आवाजामुळे बैल उधळली. अन त्यामध्ये दोन लहान मुले जखमी झाली आहेत.
शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप गावात काल बैल पोळ्यानिमित्त विनापरवाना डीजे लावण्यात आला. या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे दोन बैल बिथरली अन बैल सैरावैरा पळताना दोन लहान मुले बैलांच्या पायाखाली आल्याने जखमी झाली. त्यामुळे या डिजे चालकावर तसेच त्यांना डीजे वाजवण्यास सांगणाऱ्या संयोजकांवर शिक्रापुर पोलीस कारवाई करणार का….? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
शिरुर तालुक्यात अनेक गावात अनधिकृत डिजे…?
शिरुर तालुक्यात काल भाद्रपद पोळ्यानिमित्त शिरुर, रांजणगाव आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावात अनधिकृतरीत्या डिजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे पिंपळे जगताप सारखी दुर्घटना घडली. त्यामुळे इतर गावात अनधिकृतरीत्या डिजे वाजवणाऱ्या तसेच डिजे वाजविण्यास सांगणाऱ्या संयोजकांवर पोलिस कारवाई करणार की राजकीय दबावाला बळी पडणार हे येणारा काळचं ठरवेल.
Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…