आरोग्य

पोट टम्म फुगलेलं दिसत करा ‘हा’ उपाय

पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यायाम, डाएट आदी करणे भाग आहे. त्याशिवाय वजन कमी होणार नाही. मात्र ज्यांचे वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटींगची समस्या असते. अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो. पोट फुगते आणि कपड्यांतूनही दिसून येते.

काही वातूळ खाल्यावर तसेच तळलेले खाल्यावर ही समस्या उद्भवते. काहींना झोपेच्या कमतरतेमुळे ब्लोटींग होते. यावर उपाय करणे तसे सोपे आहे जाणून घ्या काय करायला हवे. सतत ब्लोटींग होत असेल तर ही समस्या कमी होण्यासाठी किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतोच. तेवढे दिवस काही नियम लक्षात ठेवा. आहारात काय घ्यावे काय नाही हे जाणून घ्या. त्यानुसार आहार घेतल्यावर ब्लोटींगची समस्या नक्कीच दूर होईल.

1) दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात औषधी काही असेल तर ते पाणीच. पोट साफ झाल्यावर अडकलेली घाण निघून जाईल. त्यामुळे पोट छान साफ होईल.

2) सगळ्यात आधी साखर आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. सतत गॅस होणाऱ्यांना सोडा प्यायची सवय असते. मात्र सारखा सोडा प्यायल्यामुळे ब्लोटींग होते. साखर आणि सोडा टाळायचा.

3) आहारात आलं असायला हवे. आल्याचे पाणी प्यायवे. तसेच सब्जाचे पाणी रोज प्या. सब्जा पचन चांगले व्हावे यासाठी फायद्याचा आहे. पोटाला गारवा ही मिळतो. ब्लोटींगमुळे जर दुखत असेल तर त्रास कमी होते.

4) चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे ब्लोटींगची समस्या वाढते. पाव, ब्रेड असे बेकरी प्रॉडक्ट्सही खाऊ नका. पोटात जाऊन फुगणारे काहीही खाणे चांगले ठरणार नाही. त्यामुळे हे सगळे पदार्थ टाळणे फायद्याचे ठरेल.

5) जिऱ्याचे पाणी, बडीशेपेचे पाणी पचनासाठी फार उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज न चुकता असे पाणी प्यायचे. ब्लोटींग झटपट कमी होईल. पोट साफ होईल आणि पोटाचा फुगलेला भाग लगेच कमी होईल. हे उपाय करुन जर फरक पडत नसेल तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊ या. पोट फुगण्यामागे इतरही कारणे असू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago